Friday, 29 April 2011

प्रेमाचा झुला

तू सोडून गेलीस
तर जीवन एकाकी आहे
तूच सांग मला
तुझ्याशिवाय जीवन काय बाकी आहे

तुला कसं वाटल  की
मी तुझ्यावाचून जगेन
तुझी सोबत नसताना
कशी भविष्याची स्वप्न बघेनदुनियेला नाही समझली
तगमग आपल्या मनाची
तुला तर कल्पना होती
आपण पाहिलेल्या स्वप्नांची

तू परत मागे वळ
आयुष्य पुन्हा बहरेल
तू पुन्हा साथ दे
हे दुःख  क्षणात सरेल

शपथ आपल्या प्रेमाची
मी देत आहे तुला
ह्या मनातल्या प्रेमाचा
परत एकदा झुलव तू झुला


यशवंत

2 comments: