Sunday, 6 May 2012

त्रिकोणी चौकट...... ( भाग - २ )

        
          विवेकला सार काही आठवत होत जणू सार काही कालच घडल्यासारख ... सोनिया त्याच्या कॉलेजच्या ग्रूप मधली दिसायला एकदम सुंदर नाही पण थोडी सावळी, बोलक्या डोळ्यांची , चाफेकळी नाकाची, नेहमी हसत राहणारी आणि सतत आपली बडबड करत राहणारी. तिचे विस्कटलेले केस तर तिच्या ह्या साऱ्यामध्ये भरच घालत होते.. विवेकला ती काही पहिलाच दिवशी नाही आवडली पण ग्रूप मध्ये जसा जसा तो  रमू लागला तसा  सोनिया मध्ये पण रमू लागला होता. अनेक वेळा कॉलेज मध्ये येण्याचा मूड नसेल तरी तो फक्त सोनिया आपल्या सोबत असेल ह्या विचारानेच कॉलेजला यायचा. सोनियाच मात्र वेगळाच होत तिला विवेक म्हणजे कॉलेज मधला एक मित्रच मानत होती ह्यापलीकडे मात्र तिने कधी विचार केलाही नव्हता. कारण सोनिया साठी सगळ्यात जास्त महत्वाच होत  ते  म्हणजे तीच करीअर .. विवेक सोनिया मध्ये गुंतत चालला होता हे हळू हळू सोनियालाहि कळू लागल होत तिची ह्या साऱ्यामध्ये फार घुसमट होत होती कारण तिलाही विवेक बद्दल थोड फार का होईना पण आकर्षण वाटू लागले होते पण आपल्या करीअर च्या मध्ये तिला ह्या सगळ्या गोष्टी नको होत्या. ....
 
          अर्पिता सोनियाची एकदम जीवाभावाची मैत्रीण ती सुद्धा त्यांचाच ग्रूप मध्ये होती आणि तिचा जीव मात्र विवेक मध्ये अडकला होता . विवेकला तर ह्या साऱ्याची काही कल्पनाच नव्हती. विवेकच ते राजबिंड रूप, स्मार्टनेस ह्या सगळ्यावर अर्पिता भाळून गेली होती आणि अर्पिता सुद्धा दिसावयास खूप सुंदर आणि स्मार्ट होती. पण सोनिया पुढे त्याला मात्र काहीच दिसत नव्हत . सोनियाने ह्या साऱ्यामध्ये आपल्या मनाचे ऐकायचे ठरवले आणि तिने सुद्धा आयुष्यभर विवेक सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आणि तिने हि गोष्ट पहिल्यांदा सांगितली ती म्हणजे अर्पिताला आणि हे सार एकटाच अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकली ...
आणि हे सार विवेक ला सांगायची जबाबदारी सोनियाने अर्पिताला दिली कारण हे सर्व जाऊन विवेक ला सांगायचं धाडस सोनिया कडून होत नव्हत.
 
          अर्पिताने जेव्हा हे सार एकल तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी हेच तिला कळत नव्हत. स्वताच स्वप्न डोळ्यासमोर उद्धवस्त होताना ती बघत होती आणि तिच्या मनावर तिचा ताबा नव्हता राहिला. तिने ठरवलं कि काही झाल तरी विवेक ला आपण मिळवायचं हाच विचार ती करू लागली. विवेकला भेटायला जाण्यासाठी   ती निघाली पण मनांत काही वेगळच ठरवून ...................
 
क्रमश....