Monday 16 January 2012

त्रिकोणी चौकट......

      जोराने दार बंद करुन विवेक लॉंबीमधे आला. लिफ्टच बटन दाबल आणि अस्वस्थपणे लिफ्टची वाट पाहत होता.लिफ्टच्या इंडिकेटरवरचे आकडे बदलत होते १,२ ३ ..... पण २२ व्या मजल्यावर लिफ्ट यायला अजून वेळ लागला असता. तो तसाच स्टेप्सवरून  खाली धावत निघाला. खिशे चाचपले आणि गाडीची चावी काढून निघाला. बिल्डिंगच्या गेट जवळ येऊन जोरात गाडीचा हॉर्न वाजवून त्याने आणि त्या शांत मध्यरात्री गाढ झोपी गेलेल्या अनेकांची झोपमोड केली. वॉंचमेनने घाई घाई मध्येच सलाम करून बिल्डींगचा गेट उघडला आणि मनातल्या मनात विवेकला शिव्याहि दिल्या. एवढ्या मध्यरात्री कुठे निघाला आहे हा असा विचार करतच वॉंचमेन आपल्या जागेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

      विवेक गेटच्या बाहेर येऊन मुख्य रस्त्याच्या दिशेने निघाला . कुठे जायचा आता हा प्रश्न त्याच्या मनात होता. कुठेतरी लांब जाव एवढंच त्याला ह्या क्षणी वाटत होत.

      पेट्रोल पंप च्या दिशेने वळून थोडस पेट्रोल गाडीत टाकून तो मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जोराने गाडी पळवत होता मधेच मागे वळूनही बघत होता. कुणी आपला पाठलाग तर नाही ना करत आहे हीच भीती त्याला सारखी सतावत होती. गाडी वाऱ्याच्या वेगाने पळत होती तसा त्याला  थोडासा गारठा जाणवू लागला होता.

      गाडी जशी जशी पुण्याच्या दिशेने पळत होती तस तस त्याच मन मागे जाऊ लागल खूप साऱ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर rewind होऊ लागल्या.परी, त्याच आणि सोनियाच लग्न, आई बाबांचा विरोध,नोकरी मधला struggle ,कॉलेजचे दिवस, मित्र, सोनिया आणि त्याच प्रेम,...खूप मागे चालला होता विवेक. कडू-गोड साऱ्या आठवणी  ह्या क्षणाला त्याच्या मनात एकमेकांशी जणू काही स्पर्धाच करत होत्या.....

क्रमश....

5 comments:

  1. छान सुरुवात...
    पण एक फुक्कटचा सल्ला..
    एखादी स्टोरी पार्ट्स/ क्रमशः टाकताना एखाद्या महत्त्वाच्या वळणावर आणून ठेवायची मग पूढे उत्कंठा लागत राहते.

    ReplyDelete
  2. दीपक ...

    प्रतिक्रियेबद्दल आणि सल्ल्याबद्दल धन्यवाद !!!!
    तुमचा सल्ला पुढल्यावेळी नक्की लक्षात ठेवीन...

    यशवंत...

    ReplyDelete
  3. Chaan aahe..
    Laukar lihi full story..

    ReplyDelete