Tuesday, 3 January 2012

सौंदर्य शोधण्याची कला....

     गेले काही महिने मी सुरेश पेठे काकांची चित्रे, सुहास आणि पंकजची फोटोग्राफी, क्रांतीताईच्या  गझल आणि कविता , अनघाताई आणि महेंद्र काकांचे ब्लॉगवरचे पोस्ट ह्या सर्व गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेत होतो. त्यासोबतच मनातच आपणही अस काही कराव अस नेहमी वाटत होत. प्रत्येकाची हि एक कला होती आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृती मध्ये एक सौंदर्य भरलेले होते. नेहमी अस वाटत होत हे सौंदर्य देवाने त्यांनाच  दिल आहे अस आपल्याला नाही जमू शकणार.  मनात हे एकदम घर करून गेल होत.

     हळूहळू ह्या सर्वांच्या कलाकृतीचा प्रभाव मनावर पडत गेला आणि मनातले नकारात्मक विचार बदलू लागले. प्रत्येकाकडे देवाने एकच कला दिली होती ती म्हणजे आयुष्यातलं सौंदर्य शोधण्याची. उगाचच नाही हि मंडळी सर्व सामन्याप्रमाणेच रोजच्या धावपळीतून हे सर्व लोकांपर्यंत पोहचवत होते.

     सुरेश काकांची चित्रे म्हणजे त्याच्या सभोवतालच्या परिसरातलीच होती जी त्यांनी त्यांच्या रंगातून आपल्यासमोर आणली. सुहास आणि पंकजला तर ती नजर मिळाली होती जी कॅमेरा पलीकडली आहे पण सारी छायाचित्र तुम्हा आम्हा सर्वांच्या रोजच्या आयुष्यातालीच होती. क्रांतीताईच्या  गझल आणि कवितांनी आयुष्यातले अनेक सारे भाव हळुवारपणे उलगडलेले आहेत. अनघाताई आणि महेंद्र काकांच्या  पोस्ट मध्ये तर रोजच्या रुटीन प्रसंगातले  अनेक सारे पैलू बघायला मिळतात. खरच ह्या सर्वांनी आयुष्यातलं सौंदर्य शोधण्याची कला जोपासली आहे आणि त्यामुळेच आपल्याच सर्व सुंदर पाहायला आणि वाचायला मिळत आहे.

   मी आता देवाकडे एकच गोष्ट मागेन कि आता मला माझ्या आयुष्यात सौंदर्य नको आहे तर आयुष्यात जे काही आहे त्यातलं सौंदर्य शोधण्याची कला माझ्याही अंगी जोपासली जावी ....10 comments:

 1. धन्यवाद भक्ती !!!!

  ReplyDelete
 2. शोधा म्हणजे सापडेल...चांगले लिहिलेस...नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!

  ReplyDelete
 3. धन्यवाद सागर!!!! शोध सुरु झाला आहे :)

  ReplyDelete
 4. असाच छंद जोपासत जा..अन ती कला हि तुला लवकरच आत्मसात होवो..हि सदिच्छा !! :)

  ReplyDelete
 5. सौंदर्य शोधण्याची कला माझ्याही अंगी जोपासली जावी!!!
  आमच्या सदिच्छा आहेत तुमच्याबरोबर ..

  ReplyDelete
 6. धन्यवाद बंड्या साहेब !!!

  ReplyDelete
 7. सुंदर !
  मी माझ्याबद्दल वाचलं आणि विचारात पडले...मी ही अशी कशी काय बनले माहित नाही. जगता जगता झालेय खरी अशी.
  धन्यवाद रे माझा उल्लेख केल्याबद्दल. आता कधी माझी गाडी घसरली आणि रडका मार्ग धरू लागली की मला तुझी ही पोस्ट आठवेल. :)

  ReplyDelete
 8. धन्यवाद अनघाताई !!!!
  जे मनात येईल ते उतरवत जायचं अस कोणी तरी म्हटलं होत :)..
  I am just following them...
  आणि जेव्हा माझी गाडी घसरेल किंव्हा रडक्या मार्गावरून जाईल तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या पोस्ट असतील :)

  ReplyDelete
 9. अभिनंदन आणि शुभेच्छा यशवंत!

  ReplyDelete