Friday, 28 September 2012

वेडी मीरा


तुझ्या प्रीतीत रंग भरावे मी
तुझी वेडी मीरा ठरावे मी

खेळ आयुष्याचा जिंकता जिंकता
तुझ्यासोबत एकदा हरावे मी

परतून येशील ना रे आता
किती आठवणीत झुरावे मी

निसटुनी जाती रेशीमबंध सारे
हृदयाशी त्यांना घट्ट धरावे मी

पुरे झाले आता दु:खाचे निखारे
तुझ्यासाठीच ह्या जगी उरावे मी.........

यशवंत

3 comments:

  1. व्वा व्वा... अजून येऊ देत :) :)

    ReplyDelete
  2. kavita chhan aahe,, blog pan aavadla,, aata vachen,

    ReplyDelete
  3. धन्यवाद रोहिणीताई खूप दिवसांनी कोणीतरी कमेंट दिली ....

    ReplyDelete