त्रिकोणी चौकट......
त्रिकोणी चौकट...... ( भाग - २ )
          अचानक जोराने वाजलेल्या हॉर्नमुळे विवेक भानावर आला. आपण 
आयुष्याची पानं पालटून खूप मागे गेलो होतो हे त्याच्या ध्यानात आलं. 
घड्याळात पाहिलं तर एक वाजून गेला होता आणि रस्त्यावरची वाहतूक काही कमी 
झाली नव्हती. आजकाल त्याच्या मनाच सुद्धा तसाच झाल होत.. अनेक सारे विचार 
त्याच्या मनात रेंगाळत असायचे. सोनिया, परी, ऑफिस आणि अर्पिता..
       अर्पिताचा विचार त्याच्या मनात आला आणि त्याला त्यादिवशी 
भेटायला आलेली अर्पिता आठवली. काहीही करून विवेकला मिळवायचं असच ती 
त्यादिवशी ठरवून आली होती. सार काही मनात मांडून ती विवेक समोर उभी होती. 
बाकी होत ते फक्त विवेकला सांगायचं. हळू हळू अर्पिताने सार काही विवेकला 
सांगायला सुरुवात केली.अर्पिताच्या मनातले सारे विचार ऐकून विवेकला धक्का 
बसला होता. विवेक सोनियासोबत जी स्वप्न पाहत होता त्यात अर्पिताची जागा 
कुठेच नव्हती आणि विवेकने सुद्धा क्षणार्धात अर्पिताला नकार दिला. त्यानंतर
 निघून गेलेली अर्पिता अनेक वर्ष सोनिया आणि विवेकच्या संपर्कात आलीच 
नाही...दिवसामागून दिवस गेले विवेकने सोनियाला त्याच्या प्रेमाची कबुली 
दिली त्यानंतर घरातल्याच विरोध असूनही दोघांनी लग्न केल.. दोघांचा संसार 
फुलू लागला होता.. काही वर्षानंतर सोनियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 
सार काही एखाद्या चित्रपटातल्या गोष्टीसारख सुरळीतपणे चालू होत... 
         त्यांच्या त्या संसाराला कुणाची नजर लागली काय माहित.. ऑफिस 
वरून येताना परीला पाळणाघरातून घेऊन जायचं हा सोनियाचा दिनक्रम ठरलेला 
होता.ऑफिस वरून निघायच्या आधी सोनियाने विवेकला फोन केल.. 
"हेल्लो, मी निघाली आहे .."
"एवढ्या लवकर निघालीस ..आजकाल काम कमी आहे वाटत..!! " विवेक सहजच चिडवण्यासाठी बोलला...
"हो तुला काय माहीत माझी काम.. तू तर आपल ऑफिसच काम घेऊन बसतोस दिवसभर. "
"हो का राणीसरकार.. "
"आता काही लाडीगोडी लावायची गरज नाही आहे "
 
मी फक्त एवढंच सांगायला फोने केला कि मी निघत आहे ..जाताना परीला घेऊन जाईन तू पण निघ लवकर उशीर करू नकोस .."
"हो ग, निघेन लवकर तू ..सांभाळून जा .."
"बाय ." 
"बाय ."
विवेकने फोन ठेवला आणि तो स्वतच्या कामाला लागला. बाईसाहेबांचा 
परत फोन येईलच, परी भेटल्यावर ..तेव्हा बोलूच .. असा विचार करून तो कॉफी 
आणण्यासाठी गेला.
कॉफी पीत पीत त्याने कामाला सुरुवात केली परत एकदा..  पण आज 
त्याच तसं लक्ष लागत नव्हत कामात.. पण हे presentation काहीही करून दोन 
दिवसात client ला द्यायचच होत.
थोड्या वेळाने त्याच्या मोबाईलची रिंग वाजली आणि  त्याने नंबर 
पाहिला तर अनोळखी होता. संध्याकाळी अनोळखी नंबर वरून कोण बर फोन करत असेल 
असा विचार करतच त्याने उचलला.
"हेल्लो,  विवेक?? "
"हां बोला,  कोण बोलत आहे? "
"मी आरती, परीच्या पाळणाघरातून बोलत आहे ..तुम्ही जरा इथे याल का? "
"मी???? " "का? काय झाल? आणि असाही सोनिया येतच आहे परीला न्यायला तिकडे ! "
"पण तुम्ही इथे येन गरजेच आहे ..." 
"हो पण काय झाल ते तरी सांगाल का ???"
 
"तुम्ही इथे या मगच मी तुम्हाला सांगू शकते. "
आता काय झालं ह्या बाईला कि मला फोन करून बोलावत आहे. सोनियाला 
फोन करून बघू ती काय बोलते मग ठरवू जायचं कि नाही.विवेकने सोनियाला फोन 
केला पण सोनिया फोनच उचलत नव्हती. ठीक आहे बघू काय झाल असेल.. नाहीतर 
एवढ्या तातडीने आपल्याला बोलावणार नाहीत...काम बघू उद्या सकाळी येऊन करू...
परीला काही बर वाईट तर झाल नसेल ना ..शंकेची पाल त्याच्या मनात 
चुकचुकली पण असा वाईट विचार आपण का करत आहे असे बोलून विवेक सरळ 
परीच्या पाळणाघराच्या दिशेने निघाला ....
क्रमश....