वाचन,लेखन ,कॉम्पुटर ह्याशिवाय माझ्या लाइफमध्ये महत्वाच आहे ते म्हणजे माझे मासे....
ज्यांना मी जीवापाड जपतो खास करून discus मासा सगळ्या मासाचा राजाच असेल अस बोला हवा तर
अरे हो discus म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल ना ??? मी आहे ना मग सांगायला ...Discus एक माशांची जात आहे जी दिसायला खूप सुंदर असते वेगवेगळे रंग त्या रंगाच्या designs पाहू मन अगदी हरखून जात
तसे मासे पाळायची आवड मला लहानपणापासूनच तेव्हा एक एक मासे आणून मी बाटली मध्ये ठेवायचो पण fishtank घ्याच मनात नेहमी होत आणि मुहूर्त भेटला तोः म्हणजे दहावीचा निकाल लागल्यावरच ...
शिष्यवृतीचे थोडे फार पैसे जमवून मी माझा पहिला secondhand fishtank विकत घेतला तेव्हा साधे मासे आणायचो जे माझ्या खिशाला परवडतील असेच...
मनात मात्र तेव्हा discus मासा घ्यायची इच्चा भरपूर होती पण त्यासाठी मला वर्षभर पोकेत्मोनेय पैसे साठवावे लागले असते म्हणून म्हटलं नको राहू देत. जेव्हा एखादी गोष्ट मनात असताना मिळत नाही ना तेव्हा त्याबद्दलच आकर्षण अजून वाढत जात तसच माझ ह्या बाबतीत झाल ... जेव्हा जॉबला लागलो तेव्हा मात्र मी हा मासा विकत घेण्याच धाडस केल..
धाडसच म्हणावं लागेल कारण हा मासा जितका सुंदर दिसतो तितकाच नाजूक आहे. discus साठी tank च तापमान सांभाळाव लागत ,पाणी स्वचछ हव , खूप काही होत आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये fail झालो . मी घेतलेले चार मासे दोन दिवसामध्ये मेले [:(] . घरातल्याच्या खूप शिव्या खाव्या लागल्या [:(]. पण पुन्हा मागच्या वर्षी मी discus सांभाळायचे ह्या जिद्दीने उठलो आणि चार discus मासे विकत आणले आणि दोन महिन्यानंतर हे चार मासे सेट झाल्यानंतर अजून एक जोडी आणली .आज गेले सहा-सात महिने झाले हे मासे माझ्याजवळ मस्त मोठे झालेत माझ्या ओर्कुट वर profile वर ह्यातल्या एका मासाचा फोटो टाकला तेव्हा अनेक परदेशी लोकांनी माझ्या जवळ अशा माशाची पिल असतील तर आम्हाला पाठवून दे अशी मागणी केली. (त्याच सहा माशांचे फोटो इकडे देत आहे )त्या पिल्लांचे पैसे द्यायला ते तयार होते पण माझ्याजवळ इन मीन सहाच मासे मी कुठून देणार त्यांना पिल्लं
मग असाच मनात विचार आला कि का नाही ह्या माशांची पिल्लं आणून मोठ करूयात आणि विकुयात पण तेवढ धाडस होत नव्हत ... पण त्यादिवशी अचानक माझे ओर्कुट वरचे फोटो पाहून माझा एक शालेय जीवनातला राहुल नावच मित्राने call केला. तेव्हा राहुलला पण ह्याची आवड आहे समझल मग काय आम्ही दोघे जनांनी आमचा business चालू करायचं ठरवलं.छोटा का होईना पण business चालू करायचा अस ठरलं आमच .ह्या सगळ्यामध्ये राहुलचा अजून एक मित्र रोहन भेटला आणि आमची टीम तयार झाली .
त्यांनतर काही दिवस आमचे मोठे fishtank बनवण्यामध्ये गेले आणि आणि मुंबई मध्ये माशाची पिल्लं शोधण्यात गेली. एका आठवड्यानंतर आम्हाल मुलुंड मध्ये बालकृष्ण प्रभू नावाचा मुलगा भेटला जो आमच्या पेक्षाही ह्या माशा साठी वेडा होता. सुदैवाने त्याच्याकडे १०० पिल्लं होती जी आम्ही विकत घेतली.आणि मग आमच ठरलं कि राहुल ४० पिल्लं ,रोहन २0 पिल्लं आणि मी ४० पिल्लं सांभाळणार.
आज जवळ जवळ दोन आठवडे होत आले आहेत पिल्लं अजून लहान आहेत.ऑफिसवरून आल्यावर वेळच्या वेळी खायला देणे त्यांचा पाणी बदलन हे सगळ करता करत दिवस कधी संपून जातो कळतही नाही. खूप जपाव लागत आहे ह्या पिल्लांना आता थोडी आजारी पडली आहेत तर मग औषध देऊन treatment करावी लागत आहे. सार काही मी करत आहे का मला नाही माहित business असला तरी एक वेगळीच नशा ह्या सगळ्याची. हि सगळी पिल व्यवस्तीत मोठी होऊ देत एवढंच वाटत आहे. कुठे तरी मनात प्रश्न आहे कि मी business म्हणून करत आहे का हे सार कि माझ्या पिल्लांना मोठ करत???
प्रश्नाच उत्तर सापडायला काही काळ जावा लागेल.....
oye...ya lekha shivay janu tuza blog apura hota.. :)
ReplyDeleteTu chan lihila ahe tuja experience , same maja experience dekhil javalpass asach ahe
ReplyDeleteyash are roj pani change karava lagta ka ?
ReplyDeletekaay khatat he mase ? tu mhnala hotas tu khar la yeto tynacha khana ghyayla...
ani tank cha temp. kasa controle kartos ? tu pilla vikat ghetlis ki tujhya kade aslelya masyanni andi ghatli hoti ??
khup chan... Yash. Keep going. All the best.. Asach vadhav tuza chhand.
ReplyDeleteso sweet!
ReplyDeletespecial mansach chhand japtat tyatla tu ek ahes
ReplyDeleteKeep going. All the best
वाह छान....मासे बघताना मन खुप प्रसन्न होत :)
ReplyDeleteमला हे मासे विकण्यासाठी अजिबात नाही आवडले. मुसलमान लोकं पण वर्षभर बकरा पाळून त्याला इदच्या दिवशी मारतात... तसेच काहीसे वाटते हे. एखाद्यावर प्रेम करून मोठं करावं- आणि मग विकून टाकावे हे काही पटत नाही माझ्या मनाला.
ReplyDeleteकॉमेंट प्रसिद्ध नाही केलीत तरीही चालेल..
महेंद्र आभार तुम्ही पोस्ट वाचल्याबद्दल
ReplyDeleteतुम्ही बोललात ते पटल मला आम्हालाही दुख होत हे मासे विकताना
पण आम्ही हे मासे मार्ण्य्साठी नाही विकत तर दुसर्या कोणाच्या fishtank मध्ये ठेवण्यासाठी विकतो
आणि बहुतेक वेळा आम्ही हे मासे अशा लोकांना विकतो जे त्याची काळजी घेऊ शकतात.