Wednesday, 27 April 2011

कवितेच्या जगात

कवितेच्या जगात शब्द पोरके नसतात
त्यांना कुणीतरी   एक वेडा भेटतो
जवळ घेतो प्रेम करतो
कधी कधी तर त्यांचाशीच भांडतो

हे शब्द  वेड्यावर  रुसतात
त्याच्यापासून दूर निघून जातात
तो हिरमुसला कि मग
त्याच्यावरच खट्याळ पणे हसतात

कधी त्याच्या प्रेयसीचे टपोरे डोळे होतात
कधी अश्रू बनून गालावर ओघळतात
मायेची सावली बनतात
शब्दच सारे आयुष्य बनून जगतात

त्या वेड्या वर मनापासून प्रेम करतात
सुख दुखात साथ जीवनभर साथ देतात
त्या वेड्याशी एकरूप होऊन जातात
तेव्हाच शब्दरुपी कविता सुचतात

यशवंत

1 comment: