Tuesday, 26 July 2011

तू

तळपत्या आयुष्यात तुझीच रे कमी होती
चातकाप्रमाने मी तुझीच वाट पहिली होती

कस रे तुला सांगू कस समझाऊ
तुझ्याविना मनाची काहिली झाली होती

तू काही क्षणापुरता येउन गेलास पण
चिंब भिजायची  इच्छा अपुरी राहिली होती

मागे  उरली रिती ओंजळ अन
स्वप्ने सुद्धा अश्रुंमध्ये वाहिली होती

यशवंत

Monday, 25 July 2011

अनमोल प्रीत

सोडू नकोस साथ
जर मांडलास डाव
कवडीमोल जीनं तुझ्याविना
नसे काही भाव

प्रीतीची फुले आता
मनी पुन्हा जपलीत
सुखाची स्वप्ने सारी
भविष्यामध्ये लपलीत

जखमांवर तुझी फुंकर
ना वेदनेची बात
साथ जरी दिली आता
नको सोडूस हा हात

सैरभैर झालेल्या वाटांवर
गवसलं हे अतुट नातं
तुझी माझी अनमोल प्रीत
अन प्रीतीत बहरलेली हरं एक रात

यशवंत